सावंत कोचिंग क्लासेस . . .

Director's Message

सावंत कोचिंग क्लासेस - विद्येचे माहेरघर

शिक्षण हा आपल्या आयुष्यातील कारकीर्दीचा महत्त्वाचा पाया आहे व तो घडवण्यासाठी विद्यार्थी–पालक यांच्या सहकार्याने १९९६ पासून ‘सावंत कोचिंग क्लासेस’ ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आलेला आहे. योग्य शैक्षणिक वातावरण मिळणे हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्याच्या शालेय जीवनापासूनच खूप मोठी स्वप्ने पाहिलेली असतात व ती पूर्ण करण्यासाठी दूरदृष्टी ठेऊन ते सातत्याने प्रयत्नही करत असतात. म्हणूनच आम्ही प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारे सुप्त गुण ओळखून त्यांची ध्येय व स्वप्ने साकारण्याचे कार्य ‘सावंत कोचिंग क्लासेस’ च्या माध्यमातून करत आहोत. क्लासमध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या ठेऊन विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते. ‘सावंत कोचिंग क्लासेस’ मध्ये सतत होणाऱ्या सराव परीक्षा, अवघड घटकांसाठी विशेष मार्गदर्शन, विविध शैक्षणिक पद्धतीचा वापर, सर्वसोयींनियुक्त प्रशस्तवर्ग यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणात भरघोस वाढ होत आहे.

सावंत कोचिंग क्लासेसमध्ये इ. ५ वी ते १० वी मराठी, सेमी-इंग्रजी व इंग्रजी माध्यमासाठी स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम शिकवला जातो. तसेच मुलांचा सुट्टीतील वेळ सत्कारणी लावण्यासाठी बेसिक मराठी, इंग्रजी, गणित व सुंदर हस्ताक्षर या वर्गांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन वाढवणे, शिस्त निर्माण करणे, त्यांचा मनावरील दडपण कमी करून आत्मविश्वास वाढविणे, इत्यादी बाबींमुळे सावंत कोचिंग क्लासेसने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. सावंत कोचिंग क्लासेसचे अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले असून सध्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. तसेच प्रतिवर्षी अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडविण्यात सातत्य राखल्याने ‘देदिप्यमान यशाची परंपरा जोपासणारे विद्यार्थीप्रिय ज्ञानमंदिर’ अशी ओळख ‘सावंत कोचिंग क्लासेस’ ने निर्माण केलेली आहे. नेहमीच विद्यार्थ्यांचे हीत जोपासणाऱ्या ‘सावंत कोचिंग क्लासेस’ मध्ये आपले स्वागत आहे.

Best Regards

Director,

Prof. M. B. Sawant

क्लासची वैशिष्ट्ये

  • प्रत्येक थरातील विधार्थ्यांच्या गुणवत्तेच्या वाढीसाठी विशेष प्रयत्न
  • प्रत्येक विषयास स्वतंत्र, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक
  • अवघड घटकाचे जादा मार्गदर्शन
  • प्रशस्त, हवेशीर, सर्वसोयींनियुक्त वर्ग
  • विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार वैयक्तिक मार्गदर्शन
  • मर्यादित विद्यार्थ्यांची बॅच

Parent Testimonial

katkar
-Parent

माझा मुलगा चि. अभिषेक इ.९ वी व इ. १० वी मध्ये सावंत क्लासचा विद्यार्थी होता. एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचे उत्तम नियोजन, प्रशिक्षित अध्यापक वृंद, सराव परीक्षांचे आयोजन आणि संचालक प्रा. सावंत यांचे कुशल व्यवस्थापन व नेतृत्व ही सावंत क्लासची वैशिष्ट्ये आहेत. माझ्या मुलाच्या उत्तम यशामध्ये त्याच्या परिश्रमाबरोबरच शाळा व सावंत क्लासचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या यशस्वी वाटचालीस आमच्या कुटुंबियांकडून हार्दिक शुभेच्छा !

_SawantCoaching/u/aim.png
-Parent

कष्टाची सवय लावणारा क्लास ......
माझा मुलगा दरवर्षी फक्त पास व्हायचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन असायाचा पण या क्लासमध्ये त्याला जे येत नव्हते ते वेळोवेळी समजावून दिले गेले. ‘गुणी व ज्ञानी’ राहण्यासाठी अभ्यास करावा हा मौल्यवान संदेश सावंत सरांनी दिला. माझ्या मुलग्याला इ. ९ वी मध्ये ४७.००% गुण होते. त्यामध्ये २३.५३% गुणाची वाढ होऊन त्याला ७०.७३% गुण मिळाले. याचे श्रेय मी ‘सावंत कोचिंग क्लासेस’ ला देतो.

_SawantCoaching/u/aim.png
-Parent

आत्मिक समाधान देणारा क्लास .....
‘सावंत कोचिंग क्लासेस’ चे नियोजन, उत्कृष्ट मार्गदर्शन व मुलांकडून करवून घेतलेले अखंड परिश्रम यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे नंदनवन झाले. माझ्या मुलगीच्या गुणात वाढ केवळ याच क्लासमुळे झाली. सावंत कोचिंग क्लास म्हणजे पालकांना आत्मिक समाधान देणारा क्लास आहे, यात शंकाच नाही.

client-photo-1
प्राचार्य-Parent

ज्याप्रमाणे चांगल्या मार्गदर्शनामुळे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. त्याचप्रमाणे सामान्यातुनही गुणवंत विद्यार्थी क्लासमुळे घडल्याचे आज पहावयास मिळाले. केवळ हुशार विद्यार्थांनाच क्लासमध्ये प्रवेश देऊन त्यांचे यश मिरवण्याचे या क्लासचे श्रेय नसून सामान्य विद्यार्थ्यांनाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून दाखवणे हे या क्लासचे श्रेय आहे. नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे हा क्लास म्हणजे एक विद्यालय आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

rajan
-Parent

मी माझ्या मुलाच्या क्लासच्या प्रवेशासंदर्भात द्विधावस्थेमध्येच होतो. इतर पालकांचे ऐकून मी अखेरीस सावंत कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. क्लासच्या शिस्तबध्द नियोजनामुळे माझ्या मुलाला इ. १० वी मध्ये ८२.०० % मार्क्स मिळाले. अखेरीस सावंत कोचिंग क्लासवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला. आणि अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्याने आम्हा सर्वाचा आनंद द्विगुणीत झाला. यशाचे प्रतिक असणाऱ्या सावंत कोचिंग क्लासची अशीच प्रगती होत राहो हीच सदीच्छा.

Student Testimonial

nivedita
बोर्डात पंधरावी-Student

सावंत कोचिंग क्लासेस मध्ये मला नियोजनबद्ध अभ्यास कसा करावा याची माहिती मिळाली आणि मी देखील कठोर परिश्रम घेऊन जिद्दीने अभ्यास केला. यामुळेच मला हे यश संपादन करता आले. 

preeti
बोर्डात सहावी-Student

 कर्मवीरांनी ज्ञानगंगेचे पाणी सर्व जनतेला पाजण्याचे पवित्र काम केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपणही असेच पवित्र ज्ञान आम्हाला देऊन आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अंत्यत मोलाचा हातभार लावला त्याबद्दल मी आपली आभारी आहे.

_SawantCoaching/u/aim.png
-Student

सावंत कोचिंग क्लासेसमुळे मला प्रोत्साहन मिळालेच शिवाय माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. क्लासच्या अचूक नियोजनामुळेच मी इ. १० वी मध्ये यशाचे शिखर गाठू शकले, यात शंका नाही.

mandar
बोर्डात बाविसावा-Student

सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करवून घेण्यामध्ये क्लासचा सिंहाचा वाटा आहे. सर्वच शिक्षकांनी निस्वार्थीपणे ज्ञान दिले आणि यशाचा सेतू बांधण्यासाठी लागणारे दगड आम्हाला घालून देण्यास मदत केली. विशेषतः सावंत सरांनी स्वतः लोखंडाचे चणे खाऊन इतरांचे घडे भरले. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

aishwarya
-Student

जोपर्यंत एका काचेच्या तुकड्याला पैलू पडत नाहीत तोपर्यंत तो हिरा म्हणून चमकत नाही. त्यासाठी एका जवाहिऱ्याप्रमाणे प्रा. सावंत व इतर सहकारी शिक्षकांनी आमच्यासाठी केलेल्या अथक परिश्रम यामुळेच मी स्कॉलरशिपच्या परीक्षेत यश मिळवले. या क्लासचे अचूक नियोजन, शिक्षकांचे अथक परिश्रम यामुळेच फक्त शैक्षणिक परीक्षेत नाही तर जीवनात घट्ट पाय रोवण्यासाठी आम्हाला क्लासचा फायदा मिळाला. याबद्दल मी ‘सावंत कोचिंग क्लासेस’चे आभार मानते.