Student Testimonial

nivedita
बोर्डात पंधरावी-Student

सावंत कोचिंग क्लासेस मध्ये मला नियोजनबद्ध अभ्यास कसा करावा याची माहिती मिळाली आणि मी देखील कठोर परिश्रम घेऊन जिद्दीने अभ्यास केला. यामुळेच मला हे यश संपादन करता आले. 

preeti
बोर्डात सहावी-Student

 कर्मवीरांनी ज्ञानगंगेचे पाणी सर्व जनतेला पाजण्याचे पवित्र काम केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन आपणही असेच पवित्र ज्ञान आम्हाला देऊन आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अंत्यत मोलाचा हातभार लावला त्याबद्दल मी आपली आभारी आहे.

_SawantCoaching/u/aim.png
-Student

सावंत कोचिंग क्लासेसमुळे मला प्रोत्साहन मिळालेच शिवाय माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. क्लासच्या अचूक नियोजनामुळेच मी इ. १० वी मध्ये यशाचे शिखर गाठू शकले, यात शंका नाही.

mandar
बोर्डात बाविसावा-Student

सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करवून घेण्यामध्ये क्लासचा सिंहाचा वाटा आहे. सर्वच शिक्षकांनी निस्वार्थीपणे ज्ञान दिले आणि यशाचा सेतू बांधण्यासाठी लागणारे दगड आम्हाला घालून देण्यास मदत केली. विशेषतः सावंत सरांनी स्वतः लोखंडाचे चणे खाऊन इतरांचे घडे भरले. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.

aishwarya
-Student

जोपर्यंत एका काचेच्या तुकड्याला पैलू पडत नाहीत तोपर्यंत तो हिरा म्हणून चमकत नाही. त्यासाठी एका जवाहिऱ्याप्रमाणे प्रा. सावंत व इतर सहकारी शिक्षकांनी आमच्यासाठी केलेल्या अथक परिश्रम यामुळेच मी स्कॉलरशिपच्या परीक्षेत यश मिळवले. या क्लासचे अचूक नियोजन, शिक्षकांचे अथक परिश्रम यामुळेच फक्त शैक्षणिक परीक्षेत नाही तर जीवनात घट्ट पाय रोवण्यासाठी आम्हाला क्लासचा फायदा मिळाला. याबद्दल मी ‘सावंत कोचिंग क्लासेस’चे आभार मानते.

Namrata
-Student

' दौलत और शोहरत पाने की तमन्ना
रखनेवाले आदमी बहोत होते है |
लेकीन मेहनत, लगन और इमानदारी से मिले
ज्ञान को दौलत और शोहरत का नाम
देनेवाले ‘खास’ आदमी होते है | '
अशी खास व्यक्ती बनून ज्ञान ग्रहण करून त्याचे आकलन व सदुपयोग करण्याची शिकवण देणाऱ्या ‘सावंत कोचिंग क्लासेस’ चे संचालक मा. सावंत सरांचे अचूक नियोजन व शिक्षकवृंदाचे योग्य मार्गदर्शन यातून लाभलेल्या अमोल ज्ञानाबद्दल मी आपली आभारी आहे.

Mohite
-Student

मी सावंत कोचिंग क्लासेस मध्ये इ. ७ वीत असताना प्रवेश घेतला, तेव्हापासून दरवर्षी माझ्या गुणांमध्ये सतत वाढ होत गेली. या क्लासमधील सर्व शिक्षक अगदी कष्टाळू, हुशार व मदतदार आहेत. येथील टेस्ट सिरीजचा मला पुष्कळ फायदा झाला. म्हणूनच मी माझ्या नववीच्या ८०% गुणांचे ९२% मध्ये रुपांतर करू शकलो. या क्लासने व संचालकांनी आम्हाला उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल शतशः आभार! – 

shradha
-student

क्लासमध्ये मिळालेल्या सर्व विषयांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनामुळे सर्व विषयांची भीती दूर झाली व आत्मविश्वास वाढला. शिवाय अभ्यास कसा करावा याचेही मार्गदर्शन मिळाल्यामुळे अभ्यासाचे अचूक नियोजन करण्यास मदत झाली.

mayuri
-Student

क्लासमधील शिक्षकांनी घेतलेल्या अपार कष्टामुळे आमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली. तसेच मला अभ्यासाची प्रेरणा मिळून माझ्यामध्ये काहीतरी करण्याचा आत्मविश्वास जागृत झाला आणि मला पहिल्यांदाच ८८.००% गुण मिळाले.

radhika
-Student

मला इ. १० वी मध्ये ९३.००% गुण मिळाले. या यशाचे श्रेय हे सावंत कोचिंग क्लासेसला जाते. क्लासमधील नियमित टेस्ट, अभ्यासाचे योग्य मार्गदर्शन, अनुभवी शिक्षक यामुळे मला इ. १० वी मध्ये भरघोस असे यश मिळाले. याबद्दल मी क्लासची आभारी आहे.

mayuripawar
-Student

मला हे सांगताना अत्यानंद होत आहे कि, केवळ सावंत कोचिंग क्लासेसमुळेच मी इ. ९ वीतील ८४.००% गुणांचे दहावीत ९४.९२% करू शकले. दहावीची शैक्षणिक लढाई जिंकण्यासाठी या क्लासने जे कष्ट घेतले त्याचीच गोड फळे आज मला चाखायला मिळत आहेत.

क्लासमध्ये वेळोवेळी होणाऱ्या टेस्ट, शिक्षकांचे वैयक्तिकरित्या मार्गदर्शन या सर्वाचा माझ्या यशात अंत्यत मोलाचा वाटा आहे. त्याबद्दल मी संपूर्ण सावंत क्लासची आणि पालकांची सदैव ऋणी राहीन.

aditya-adke
-Student

मला इ. ७ वी मध्ये ५९.६४% गुण मिळाले म्हणून मी निराश होतो. परंतु मा. सावंत सर यांनी आम्हाला क्लासच्या पहिल्याच दिवशी केलेल्या मार्गदर्शनाने मला पुन्हा अभ्यासास प्रोत्साहन मिळाले. शिवाय शिस्तबद्ध नियोजनामुळेच परीक्षेत कॉपी करणे यासारखा प्रकार आमच्याकडून घडला नाही. यामुळेच मला इ.१० वी मध्ये ८१.८४% गुण मिळाले. या क्लासमध्ये मिळालेल्या विद्येच्या शिदोरीवर मला माझ्या भावी आयुष्याची वाटचाल करणे सोपे होईल याची मला खात्री आहे.

anujashirke
-Student

कोणतीही विद्या किंवा कला ही एखाद्या रोपासारखी असते. निष्ठेचे खत आणि मनाच्या एकाग्रतेचे पाणी घातल्यावर ते वाढते. या उक्तीप्रमाणे एकाग्रता, परिश्रम, अभ्यासातील सचोटी आणि अपार कष्ट याची गुरुकिल्ली सावंत क्लासने दिली. एकाच ठिकाणी सर्व विषयांचे चांगल्याप्रकारे मार्गदर्शन मिळाले. क्लासमध्ये अभ्यासाची चांगल्याप्रकारे तयारी झाल्यामुळे आत्मविश्वास वाढला. त्यामुळे मला मिळालेल्या यशामध्ये 'सावंत क्लासेसचा' सिंहाचा वाटा आहे.

ajinkya
-Student

I had scored 82.82 % in IX std. but I was able to scored 94.00% in X standard due to proper guidance, accurate planning and test series of Sawant Coaching Classes . Of course credit of my bright success goes to the class. 

nikhilchougule
-Student

क्लासचे कठोर नियोजन , वैयक्तिक लक्ष व शिक्षकांनी शेवटच्या क्षणापर्यत तळमळीने केलेले मार्गदर्शन यामुळेच मी इ. ९ वी मध्ये मिळालेल्या ६७.५% गुणाचे रुपांतर ८८.१५% मध्ये सहजगत्या करू शकलो.

ruturaj
-Student

क्लासमुळेच मला माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून सकारात्मक विचार कसा करावा याचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला. म्हणूनच मी ८७.६०% इतके गुण संपादन करू शकलो.

shivali
-Student

'तुडवून टाक आकाश सार घे भरारी मस्त, वादळाशी जीवनाची झुंज दे बिनधास्त'
या चारोळीप्रमाणे माझ्या जीवनात शैक्षणिक नीतीमूल्यांची जडणघडण ही सावंत कोचिंग क्लासने अशोक चक्र या मानचिन्हप्रमाणे सर्वकष बाजूंनी घडविली. त्यामुळे आठही दिशांना जाऊन कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग भरारी मारता येईल अशी जिद्द व मानसिकतेचा ज्ञान कलश माझ्या हृदयात क्लासने ठेवला आहे. यामुळेच मला आठवीत पडलेल्या ७३.७८% गुणांचे रुपांतर दहावीमध्ये ९३.५४% गुणांमध्ये झाले. मला खात्री आहे कि मा. सावंत सरांच्या सततच्या मार्गदर्शनाने निर्माण केलेले विद्यार्थी उच्चविद्याविभूषित म्हणून जगाच्या पाठीवर चमकणारच.

fariyaz
बोर्डात सहावी-Student

'संग जया जैसा | लाभ तया तैसा ||'
या उक्तीप्रमाणे मला क्लासच्या संगतीनेच यशाचे शिखर सर करता आले. सूर्यासारख्या तेजस्वी अशा मा. श्री सावंत सर यांच्या क्लासच्या चंद्रासारख्या शीतल प्रकाश देणाऱ्या शिक्षकवर्गाच्या अचूक मार्गदर्शनामुळे आम्ही चांदण्यासारखे चमकू शकलो. याबद्दल मी सरांची सदैव ऋणी राहीन. हा तर केवळ यशाचा पायाच आहे. अजून आम्हाला यशाचा कळस गाठायचा आहे. पुढील आयुष्यात देखील सरांचे व क्लासचे सहकार्य व मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा बाळगते. धन्यवाद !