Parent Testimonial

katkar
-Parent

माझा मुलगा चि. अभिषेक इ.९ वी व इ. १० वी मध्ये सावंत क्लासचा विद्यार्थी होता. एस. एस. सी. बोर्ड परीक्षेचे उत्तम नियोजन, प्रशिक्षित अध्यापक वृंद, सराव परीक्षांचे आयोजन आणि संचालक प्रा. सावंत यांचे कुशल व्यवस्थापन व नेतृत्व ही सावंत क्लासची वैशिष्ट्ये आहेत. माझ्या मुलाच्या उत्तम यशामध्ये त्याच्या परिश्रमाबरोबरच शाळा व सावंत क्लासचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या यशस्वी वाटचालीस आमच्या कुटुंबियांकडून हार्दिक शुभेच्छा !

_SawantCoaching/u/aim.png
-Parent

कष्टाची सवय लावणारा क्लास ......
माझा मुलगा दरवर्षी फक्त पास व्हायचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन असायाचा पण या क्लासमध्ये त्याला जे येत नव्हते ते वेळोवेळी समजावून दिले गेले. ‘गुणी व ज्ञानी’ राहण्यासाठी अभ्यास करावा हा मौल्यवान संदेश सावंत सरांनी दिला. माझ्या मुलग्याला इ. ९ वी मध्ये ४७.००% गुण होते. त्यामध्ये २३.५३% गुणाची वाढ होऊन त्याला ७०.७३% गुण मिळाले. याचे श्रेय मी ‘सावंत कोचिंग क्लासेस’ ला देतो.

_SawantCoaching/u/aim.png
-Parent

आत्मिक समाधान देणारा क्लास .....
‘सावंत कोचिंग क्लासेस’ चे नियोजन, उत्कृष्ट मार्गदर्शन व मुलांकडून करवून घेतलेले अखंड परिश्रम यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे नंदनवन झाले. माझ्या मुलगीच्या गुणात वाढ केवळ याच क्लासमुळे झाली. सावंत कोचिंग क्लास म्हणजे पालकांना आत्मिक समाधान देणारा क्लास आहे, यात शंकाच नाही.

client-photo-1
प्राचार्य-Parent

ज्याप्रमाणे चांगल्या मार्गदर्शनामुळे वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. त्याचप्रमाणे सामान्यातुनही गुणवंत विद्यार्थी क्लासमुळे घडल्याचे आज पहावयास मिळाले. केवळ हुशार विद्यार्थांनाच क्लासमध्ये प्रवेश देऊन त्यांचे यश मिरवण्याचे या क्लासचे श्रेय नसून सामान्य विद्यार्थ्यांनाही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून दाखवणे हे या क्लासचे श्रेय आहे. नियोजनबद्ध मार्गदर्शनामुळे हा क्लास म्हणजे एक विद्यालय आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

rajan
-Parent

मी माझ्या मुलाच्या क्लासच्या प्रवेशासंदर्भात द्विधावस्थेमध्येच होतो. इतर पालकांचे ऐकून मी अखेरीस सावंत कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. क्लासच्या शिस्तबध्द नियोजनामुळे माझ्या मुलाला इ. १० वी मध्ये ८२.०० % मार्क्स मिळाले. अखेरीस सावंत कोचिंग क्लासवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला. आणि अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाल्याने आम्हा सर्वाचा आनंद द्विगुणीत झाला. यशाचे प्रतिक असणाऱ्या सावंत कोचिंग क्लासची अशीच प्रगती होत राहो हीच सदीच्छा.

vishwanath
डॉक्टर-Parent

माझी मुलगी कु. राधिका हिला इ. ९ वी मध्ये ८०.००% गुण मिळाले होते. इ. १० वी मध्ये या गुणाचे रुपांतर ९३.०० % मध्ये झाले, ते फक्त सावंत कोचिंग क्लासमुळेच. या क्लासचे संचालक श्री. सावंत सर आणि इतर शिक्षक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे मी सावंत कोचिंग क्लासेसचा अतंत्य ऋणी आहे.

khamkar
प्राचार्य-Parent

पाल्याच्या यशामध्ये क्लासचा मोलाचा वाटा आहे. माझी मुलगी कु. अमृता लाड हिला इ. ९ वी मध्ये ८५.७३ % गुण होते. सावंत कोचिंग क्लासेस मधील खडतर नियोजन, प्रसन्न वातावरण, विद्यार्थीभिमुख शिकवण्याची पद्धत, क्लासमधून मिळणारे प्रोत्साहन यामुळे ती इ. १० वी मध्ये ९२.६६ % गुण मिळवून गुणवत्ता यादीत सतरावी आली. तिच्या उज्ज्वल यशामध्ये सावंत कोचिंग क्लासेसचा मोलाचा वाटा आहे.

vikas
-Parent

सावंत क्लासमधील शिक्षणपद्धती ऐकून मी माझ्या मुलीला इ. ८ वी मध्येच क्लासमध्ये घातले. त्यामुळे तिच्यात अभ्यासाची आवड निर्माण होऊन तिचा पाया भक्कम झाला. क्लासमधील योग्य मार्गदर्शनामुळे तिला बोर्ड परीक्षेत गणित व विज्ञान विषयात पैकीच्या पैकी गुण मिळाले.

aadke
-Parent

शिस्तबध्द नियोजन...... इतरांच्या सांगण्यावरून मी माझ्या मुलाचा सावंत कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला. सावंत सरांचे वर्षभराचे शिस्तबद्ध नियोजन पाहून 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' या तुकराम महाराजांच्या ओळी आठवल्या. माझ्या मुलग्याला इ. ९ वी मध्ये ५९.६४% गुण मिळाले होते. परंतु क्लास मधील उत्तम नियोजन आणि दर्जेदार मार्गदर्शन यामुळे त्याला ८१.८४% गुण मिळाले व त्याच्या गुणात २२.२०% ची वाढ झाल्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत. 

vandanapowar
डॉक्टर-Parent

 मी माझ्या मुलीने मिळवलेल्या गुणाबद्दल सावंत कोचिंग क्लासचे आभार मानते. तिच्या या यशासाठी क्लासच्या सर्व शिक्षकांचे कष्ट, मार्गदर्शन, नियोजन आणि तिचे स्वतःचेही कष्ट अंत्यत उपयोगी पडले. तिच्या या यशाचे श्रेय मी सावंत कोचिंग क्लासलाच देईन. धन्यवाद !

bagwan
प्राचार्य-Parent

'जिद्द, चिकाटी आणि अपार कष्ट , विद्यार्थाची प्रगती हेच आमचे उद्दिष्ट' हे विधान मा. श्री. सावंत सरांनी आतापर्यतचे गुणवंत विद्यार्थी घडवून सिद्ध करून दाखविले आहे. क्लासचे अचूक नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि टेस्ट सिरिज यामुळे माझ्या मुलीच्या मनातील बोर्डाच्या परीक्षेची भीती दूर झाली. तिच्या शंकांचे वेळोवेळी आणि सोप्या पद्धतीने निरसन करून यश कसे संपादन करावे हा मोलचा सल्ला दिला. कोणत्याही विद्यार्थ्याच्या यशात विद्यार्थ्याबरोबर गुरुजनांचाही सिंहाचा वाटा असतो. खरोखरच बोर्डाच्या परीक्षेसाठी सावंत कोचिंग क्लास म्हणजे विद्यार्थ्यांना प्रगतीचे पंख देणारे ज्ञान मंदिरच म्हणावे लागेल. धन्यवाद !

client-photo-4
न्यायाधीश-Parent

माझा मुलगा चि. मयूर याला इ. ९ वीचे एप्रिल २००७ मध्ये झालेल्या वार्षिक परीक्षेमध्ये ५९.८३% गुण मिळाले होते. पुढील वर्ष दहावी, पुढील शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाच्या परीक्षांची पहिली पायरी . इ. ९ वीचे गुण पाहिल्यावर दहावीमध्ये मुलगा चांगल्या गुणाने कसा उत्तीर्ण होईल ही काळजी ? मयूर तसा चंचल, एका जागी बसून अभ्यास करणे कठीण. सावंत कोचिंग क्लासेस बाबत माहिती मिळाली. मयूर यास सन २००७-०८ या शैक्षणिक वर्षात सावंत कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. शाळा व क्लास व्यतिरिक्त घरी अभ्यास नाहीच. परंतु दहावीमध्ये मयूरला ८३.५३% गुण मिळाले. ते पाहून खरेच आश्चर्य वाटले. सावंत कोचिंग क्लासमध्ये जे काही शिकवले गेले त्याचे हे फळ आहे. सावंत सरांचे उत्कृष्ट मार्गदर्शन, त्यांच्या शिकविण्याच्या पद्धतीचेच हे सर्व श्रेय आहे. सावंत सरांचे आभार व धन्यवाद. 

_SawantCoaching/u/aim.png
-Parent

माझा मुलगा मंदार नलावडे याला इ. १० वी मध्ये कोणत्या क्लासचे मार्गदर्शन घ्यावे यासाठी मी चिंतेत होतो. चांगल्या क्लासबद्दल चौकशी केली असता सावंत कोचिंग क्लासेस बद्दल बऱ्याच जणांकडून माहिती मिळाली. क्लासचे संचालक प्रा. सावंत सर यांना भेटलो असता त्यांनी मला क्लासच्या नियोजनाची संपूर्ण माहिती दिली. परंतु प्रवेशासाठी कोणतीही भीड घातली नाही. तेथेच मी क्लासची गुणवत्ता समजलो. माझ्या मुलग्याला १० वी मध्ये चांगले गुण मिळून त्याला हव्या असलेल्या कॉलेजला प्रवेश मिळावा हीच माझी क्लासकडून अपेक्षा होती. परंतु वर्षभरातील क्लासचे योग्य नियोजन, शिक्षकांनी केलेल्या सर्व विषयांचे मार्गदर्शन, मनमिळाऊ गुरुजन वर्ग व भरपूर सराव परीक्षा यामुळे माझा मुलगा बोर्डात २२ वा आला. क्लासमुळे त्याच्या ९ वी च्या ८४.९५% चे रुपांतर ९२.०६% मध्ये झाले. मराठी मध्ये त्यास १०० पैकी ९० गुण मिळाले. म्हणूनच सावंत कोचिंग क्लास म्हणजे खरोखरच एक विद्येचे माहेरघर आहे याची प्रचिती आली.