Summer Vacation Batches . . .

सुट्टीत घालवू नका फुकट वेळ, अभ्यास आणि खेळ यांचा घाला मेळ

बेसिक इंग्रजी

इ. ५ वी ते इ. ९ वी साठी

इंग्रजी भाषा समजणे व बोलणे ही सध्याच्या काळाची गरज आहे. क्लासमधील या कोर्समुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढतो. या कोर्समध्ये Alphabets , spellings, number, singular & plural of noun, kinds of sentences, parts of speech, articles, punctuation marks, tenses, verbal questions, wh-questions, tag questions, exclamatory sentences, affirmative & negative sentences, able to, unable to, synonyms, antonyms, idioms, इ. तसेच essay writing, letter writing, story writing, dialogue writing, news report, इ. writing skills चा सराव करून घेतला जातो.

बेसिक गणित

इ. ५ वी ते इ. ९ वी साठी

इ. ५ वी ते ९ वी तसेच शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी गणितातील मुलभूत संकल्पनांचा सराव होणे आवश्यक आहे. यासाठी बेसिक गणित कोर्सच्या माध्यमातून पाढे, पूर्णांक व अपूर्णांक यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार, घांताकाचे नियम, वर्ग–वर्गमूळ, घनमूळ, बैजिक राशी, मसावि-लसावि, नफा-तोटा, शेकडेवारी, काळ, अंतर व वेग, परिमाणे, बीजगणित व भूमितीच्या मुलभूत संकल्पना, इ. घटकांचा भरपूर उदाहरणांच्या सहाय्याने सराव करून घेतला जातो.

मराठी व्याकरण व लेखन कौशल्य

इ. ५ वी ते इ. ९ वी साठी

मराठी ही आपली मातृभाषा आहे. परंतु काही वेळेस 'अतिपरिचयात अवज्ञा' या म्हणीप्रमाणे तिच्याकडे नको इतके दुर्लक्ष होते आणि मग त्याचा परिणाम परीक्षेतील गुणांवर होतो. मराठीच्या प्रश्नपत्रिकेतील सर्वात जास्त गुण असलेले प्रश्न म्हणजे व्याकरण व लेखन. या विभागांमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी वर्णमाला, शब्दांच्या जाती व त्यांचे प्रकार, काळ, लिंग, वचन, विभक्ती, वाक्यप्रचार, म्हणी, प्रयोग, संधी, समास, अलंकार, शुद्धलेखन, विरामचिन्हे, इ. घटकांचा पूर्ण सराव करून घेतला जातो. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन, आकलन, स्वतंत्र्य अभिव्यक्ती, इ. कौशल्याचा परिपूर्ण विकास होतो.

सुंदर हस्ताक्षर

सुंदर हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढतो, सकारात्मक विचार करण्याची व कलागुण जोपासण्याची सवय लागते, भाषा समृद्ध होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होऊन उत्तम प्रगती होते. प्रत्येक विद्यार्थी स्वच्छ, सुंदर व वळणार हस्ताक्षर काढू शकतो. परंतु त्यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाचीही गरज असते. या कोर्समध्ये प्रत्येक अक्षराचे योग्य रितीने अक्षर लेखन कसे करावे, अक्षरांचा व शब्दांचा अचूक सराव कसा करावा इ. बाबींचे उत्तम मार्गदर्शन मिळते व हस्ताक्षर सुधारण्यासाठी मार्ग सुकर होण्यास मदत होते.